Breaking News

नाणे व नोटा स्वीकारण्याचे आदेश दंडात्मक कारवाईचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इशारा

मुंबई : बँकेची कोणतीही शाखा कोणत्याही रकमेचे नाणे किंवा नोटा घेण्यास नकार देऊ शकत नाही. जर बँकानी नाणे अथवा कोणत्याही नोटा घेण्यास नकार दिल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. असा रिझव्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना देण्यात आला आहे.


विविध बँकांच्या शाखांची अल्प किंमतीची नाणी किंवा नोटा नाकारण्याच्या तक्रारी येत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. नाणी एक्सचेंज करण्यास, डिपॉझिट करण्यास नकार दिल्यास दुकानदार व छोटे व्यापारी हे ग्राहकांकडून नाणी घेणार नाहीत. यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होईल. बँकांनी कोणत्याही किंमतीची नाणी बदलून देणे व डिपॉझिट करायचे असल्यास ती करून घ्यावीत तसे निर्देश सर्व बँकांनी त्वरीत आपापल्या शाखांना द्यावेत. एक व दोन रूपयांची नाणी वजनावर घ्यावीत, असा सल्लाही रिझर्व्ह बँकानी दिला आहे. आदेशाचे गैरपालन झाल्यास व उल्लंघन केल्यास संबंधीत बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा, देखील रिझर्व्ह बँकेनी दिला आहे.