Breaking News

प्रिया वारियार व दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल


औरंगाबाद : मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार आणि दिग्दर्शक ओमर लुलू यांच्याविरोधात औरंगाबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ’ओरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ’मणिक्या मलराया पूर्वी’ गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटातील गाण्यावर जनजागरण समिती आणि एमआयएमच्या पदाधिकार्‍यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार जिन्सी ठाण्यात दाखल करुन संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.