Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त टोका सिद्धेश्वर येथे शोभायात्रा


नेवासाफाटा प्रतिनिधी :- नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने सोमवारी {दि.१२} सकाळी ११ वाजता शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. महंत बालब्रम्हचारी महाराज यांनी या मिरवणुकीचे नेतृत्व केले. यावेळी मिरवणुकीत अश्वांनी सादर केलेले अश्वनृत्य सर्वांचे आकर्षण ठरले होते. महाशिवरात्रीनिमित्त त्रिदिनात्मक सोहळ्याचे धर्मध्वजारोहन महंत बालब्रम्हचारी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
या शोभयात्रेनिमित्त सिद्धेश्वर शिवलिंगास महंत बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच गोदावरी प्रवरा या नद्यांच्या संगमावर पूजन करून गोदा व प्रवरामाईला श्रीफळ अर्पण करण्यात आले. गंगापूर येथील वेदशास्त्रसंपन्न पुरोहित आचार्य सोनूगुरू देवळे व किरणगुरू देवळे यांनी यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.

यावेळी निघालेल्या शोभायात्रा मिरवणुकीत भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, उपसरपंच वसंतराव डावखर, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, कैलास झगरे, तलाठी सुनील खंडागळे, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्या कावरे, अनिल गर्जे, डॉ. मुकुंद हारदे, रामदास गव्हाणे, रमेश गंगुले, रामदास नवसे, संदीप सुडके, शांतवन खंडागळे आदी सहभागी झाले होते.