Breaking News

12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार पिडित मुलगी चार महीन्यांची गरोदर

तालुक्यातील राजुरी येथील एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणारा आरोपी ज्ञानेश्‍वर बोरकर (वय 17 वर्षे ) रा राजुरी ता. जामखेड याने तीच्या घरी कोणी नसताना दमबाजी करुन वेळोवेळी बलात्कार केला. या घटनेत पिडीत मुलीला दिवस गेले असुन ती चार महीन्यांची गरोदर आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पिडीत मुलीचे आई वडील ऊसतोड कामगार असल्याने ते अनेक वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करुन आपली उपजीविका भागवतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पिडीत मुलीचे आई वडील मुलीस राजुरी गावात आजी आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवून दिवाळी नंतर संपल्यानंतर ते सातारा जिल्ह्यातील कापसी येथील साखर कारखाण्यावर ऊसतोडणीसाठी गेले होते. पिडीत मुलगी ही 7 वी च्या वर्गात शिकत आहे. त्यांच्याच शेजारी रहाणारा आरोपी ज्ञानेश्‍वर पांडुरंग बोरकर हा पिडीत मुलीच्या घरी येत असत.

 घरी कोणी नसताना आरोपी बोरकर याने मुलीचे आई वडील साखर कारखान्यावर गेल्यापासून म्हणजे दि. अ‍ॅाक्टोबर 2017 पासून ते 9 मार्च 2018 पर्यंत मुलीस जबरदस्तीने व जीवे मारुन टाकेल अशी धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला. मुलीने सदरील घटना ही आपल्या आजी आजोबांना सांगितली. यानंतर या अल्पवयीन मुलीस खाजगी दवाखान्यात दाखल केले असता, ती गरोदर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितल्याचे फीर्यादीमध्ये म्हटले आहे. सदरची घटना मुलीच्या नातेवाईकांनी आरपीआयच्या महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या शांताबाई लोंढे यांना सांगितली. यानंतर त्यांनी पिडीत मुलीस पोलीस स्टेशनला आणून आरोपी विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यास सांगितले. यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्‍वर बोरकर याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.