Breaking News

पुण्यात खुजली गँगचे 14 जण ताब्यात

पुणे : पुणे शहर व परिसरात खुजली गँग या नावाने प्रसिद्ध असलेल्या टोळीतील 14 जणांच्या मुसक्या आवळण्यात मुंढवा पोलिसांना यश आले. बँकेतून पैसे काढणारे ज्येष्ठ नागरिक हे या टोळीकडून लक्ष्य केले जात होते. हे 14 जण मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवाशी असून गेल्या दीड महिन्यापासून ते पुण्यातील मांजरी परिसरात रहात होते.

चिन्ना बाबु कुनचाल्ला (29), सॅम्युल राज तिमोती राज (25), विजयकुमार शेखर रेड्डी (26), चल्ला सनी येलीया सल्ला (26), राजेश जेमीस गोगुल (23), संतोष देवरकोंडा रामलुर (36), राकेश दावित आवला (19), येशेबु जानु गोगला (52), शवकुमार रविबाबु पिटला (36), उतजल सुबलु आवला (40), सुभाष रवि बानाळु (29), आमुस तिपय्या आवला (32), माधव सुंदरम गोगला (37) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. या टोळीकडून चाकू, कोयता, मिरची, खुजली पावडर आदी हस्तगत करण्यात आले. या संदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.जी. गवळी करत आहेत.