Breaking News

जामखेड ते जेजुरी पायी दिंडी सोहळा 15 वर्षांपासून

जामखेड ते जेजुरी पायी दिंडी सोहळा दि. 9 ते 16 एप्रिल दरम्यान होत असून या निमित्ताने रथ व पालखी होणार आहे. शिवमल्हार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ह.भ.प. महेश महाराज देशपांडे यांनी केले आहे.


महेश महाराज देशपांडे म्हणाले की, शिवमल्हार मित्रमंडळ मागील 15 वर्षापासून जामखेड ते जेजुरी पायी दिंडी सोहळा अयोजीत केला जातो. यास आरंभ दि. 9 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता खंडोबा मंदिर येथून शहरप्रदक्षिणा घेऊन होईल. पहीला मुक्काम अरणगाव येथे होणार असून संध्याकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत खंडू गोंधळी दासखेड यांचे किर्तन होणार आहे. दि. 10 रोजी वालवड येथे मुक्काम होणार आहे. याठिकाणी कल्याण गोंधळी आष्टी यांचे किर्तन होणार आहे. दि. 11 रोजी श्रीगोंदा येथे मुक्काम होणार असून दत्तू आढाव आराधी मंडळी मातकुळी यांचे किर्तन या मुक्कामी होणार आहे. दि. 12 रोजी पवार वस्ती दौंड येथे मुक्काम होऊन शिवशक्ती गोंधळी यांचे किर्तन होणार आहे. दि. 13 रोजी माळवाडी येथे मुक्काम व महेश महाराज यांचे कीर्तन, दि. 14 रोजी मोरगाव नेवसे वस्ती येथे मुक्काम राजाराम धोंडे यांचे किर्तन, दि. 15 रोजी जेजुरी (पायरी) येथे मुक्काम कृष्णा नांदे व किरण नांदे यांचे किर्तन होईल.
श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन महाप्रसाद पंगत होऊन दिंडी सोहळा समाप्त होईल. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सुभाष मेनकुदळे, अर्जुन निमोणकर, चंद्रकांत जगताप, दिगांबर निमोणकर, राजेंद्र परदेशी, अक्षय मोहळकर, संजय कोरपे, नितीन घायतडक, रामभाऊ राळेभात, धनंजय एकबोटे, लखन देशपांडे, वसंत राळेभात, विशाल शेंडकर, बंडू जमदाडे, नामदेव राऊत, परसराम फाळके आदी संयोजक प्रयत्नशील आहेत. असे हभप महेश महाराज देशपांडे यांनी सांगितले.