Breaking News

धुळे येथे पारा 41 अंशावर


धुळे शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. बुधवारी तापमानाचा पारा 41 अंशावर स्थिरावला आहे. यंदाच्या चढत्या तापमानामुळे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मार्च महिन्यातच मे हिटचे तापमान सद्या जाणवत आहे. शहरात दररोज तापमानात वाढ होत असून अवघ्या दोनच दिवसात पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. एकीकडे तापमान वाढत असताना, दुसरीकडे आर्द्रता मात्र घटत असल्याने उन्हाची दाहकता वाढत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या दिनचर्येवरही होत आहे. दुपारी वाढत्या तापमानामुळे रत्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तर रुमाल, गॉगल, छत्री यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.