Breaking News

तटरक्षक दलाचा सागरी प्रदूषण नियंत्रण अभ्यास उपक्रम संपन्न


रत्नागिरीतील फिनोलेक्स बंदरावरील कोल जेटीवर रत्नागिरीच्या तटरक्षक दलातर्फे पोलरेक्स हा सागरी प्रदूषण नियंत्रण अभ्यास उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये तटरक्षक दलाबरोबरच बंदर विभाग व फिनोलेक्स पोर्ट यांची जहाजे आणि कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. 

जहाजातून गळती झालेले तेल सागरी जीव व वनस्पतींसाठी घातक असते. ते तेल किनार्‍यावर आल्यास मासेमारी आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून या उपक्रमात मुख्यत: जहाजातील तेलगळतीवरील नियंत्रणाची कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी तटरक्षक दल ही देशातील नोडल यंत्रणा आहे. असे उपक्रम तटरक्षक दलातर्फे सातत्याने हाती घेतले जातात. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा असा उपक्रम भारतीय तटरक्षक दलातर्फे जेएसडब्ल्यू बंदरात राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.