Breaking News

‘प्रवरा’चा लोणावळा येथे शुक्रवारी विद्यार्थी मेळावा

प्रवरानगर - प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि अहमदनगर येथिल विखे पाटील फाउंडेशन या संस्थेच्यावतीने ‘प्रवरा परिवार’ या संकल्पनेतून एकत्रितपणे लोणावळा येथे येत्या शुक्रवारी {दि. ३०} ‘प्रवरा मेगा अल्युमिनिमीट २०१८’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी दिली.

लोणावळा येथे डेला रिसॉर्टमध्ये होणाऱ्या या मेळाव्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, अनुदान व प्रकल्प संचालिका डॉ. प्रिया राव, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे नकुल तांबे, विखे फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी लेफ्ट. जनरल बी. सदानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक प्रयत्न करीत आहेत.