Breaking News

विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घ्यावी : शिवूरकर


स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाज बदलवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याची आवशकता आहे. स्त्रियांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी हुंडापद्धती बंदी, स्वयंरोजगार, शेती तसेच महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, असे प्रतिपादन निशा शिवूरकर यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात यावेळी शिवूरकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लोणी खुर्दच्या सरपंच मनीषा आहेर होत्या. यावेळी प्रा. शिवाजीराव गायकवाड, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य गोवर्धन खंडागळे, प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, उपप्राचार्य प्रा. निलेश दळे आदींसह तीनही महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.