Breaking News

शिवसेनेची शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आढावा बैठक

शेवगाव प्रतिनिधी - लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यानेे विविध पक्षांचे दौरे व पक्षांचे निरीक्षक आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवार कोण असावा यासाठी मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. शिवसेनेचे पक्ष निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा दौरा करत मतदार संघाची चाचपणी करत मतदार संघाचा आढावा घेतला._शेवगाव नेवासा रोड वरील शासकीय विश्रामगृहाझालेल्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी झालेल्या विधानसभेच्या चाचपणी बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर अ‍ॅड. अविनाश मगरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. यावर शिवसेनेचे शेवगाव पाथर्डी निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या कार्यकर्त्यांच्या भावना निश्‍चित मातोश्रीपर्यंत पोहोचायचे काम मी प्रामाणिकपणे करेल असे कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. यावेळी विकास दळवी, अमित मोरे, राजेन भोसले, शिवसेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष भारत लोहकरे, अविनाश मगरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, शहर प्रमुख सुनील जगताप, युवासेनेचे शितल पुरनाळे, हमीद पठाण, काटे , अशोक गौते, भाऊ वाघमारे, सुरेश धनवडे, अंकुश लोंढे, दिपक कपिले, पाथर्डी चे शहर प्रमुख भाऊसाहेब धस, पाथर्डी तालुका उपप्रमुख अप्पासाहेब सातपुते, पाथर्डी चे विभागप्रमुख नवनाथ वाघ, अप्पा कुलकर्णी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.