Breaking News

ऑटो रोमान्स इन मुंबईचे कलाकार शनीचरणी


सोनई तारुण्याच्या उंबरठ्यावर स्पर्धात्मक युगात मुबंई सारख्या मेट्रो मध्ये जागा, वेळ, करियर, व रिलेशन शिप चा चालू घडामोडीवर ताळमेळ कसा प्रकारे बसवता येईल, अशा मनोरंजक व प्रत्येकाच्या आयुष्याच्या जवळ वाटणार्‍या विषया वर आधारित हा एक रोमांचक संगीत प्रधान हिंदी चित्रपट ऑटो रोमान्स इन मुंबई च्या माध्यमातून प्रेक्षक याचे प्रेम मोलाचं असणार आहे ,असे मत चित्रपटाचे अभिनेता सिद्धार्थ जाजू यांनी व्यक्त केले.
 
शनी शिंगणापूर येथे 20 एप्रिल ला हा चित्रपट प्रदर्शित होत असून चित्रपट हिट होण्यासाठी शनीचरणी कलाकार नतमस्तक होऊन शनिदर्शन घेतले . या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन शक्तीशंकर,सह निर्माते कॅप्टन दोषींजी, गायक अभिजित कुणाल गाजावाला, विनोद राठोड, श्रेया, फायटर मास्टर किंग, कार्यकारी निर्माते निरंजन तर गीत संगीत सिद्धार्थ जाजूयांचे आहे. कलाकार नव्या पिढीचे अवंती का मिश्रया, अलका तिवारी, यांच्या सह अनेक कलाकारांचा अभिनय पाहण्यासारखा आहे, त्यात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळणार असल्याचा विश्‍वास यावेळी जाजू यांनी व्यक्त केला, या कलाकाराचा सन्मान देवस्थान सह माजी सरपंच भाजपचे नेवासा उपाध्यक्ष राजाभाऊ बोरुडे, शिवसेना शिंगणापूर अध्यक्ष काळूराम हटकर,अमोल कुमावत, संतोष तेलोर, बाबासाहेब हाटकर, पप्पू हाटकर, गोटीराम फुलमाली, मनोज कुर्‍हाट, यांच्या सह अनेकांनी केला.यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.