Breaking News

‘पेमगिरी’मध्ये शनिवारी मारुती मंदीराचा जिर्णोद्धार आणि पुस्तक प्रकाशन


तालुक्यातील पेमगिरी येथील मारुती मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर मूर्तीची पुर्नप्रतिष्ठापणा सोहळ्याची सांगता आणि ‘पेमगिरी : स्वराज्य संकल्प भूमी’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी {दि. ३१ } सायंकाळी पाच वाजता होणार आहे. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पेमगिरीचे सरपंच सोमनाथ गोडसे यांनी दिली. पेमगिरी फाऊंडेशन ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला.
सुमारे ७५ वर्षांपूर्वी बांधलेल्या मारुती मंदिराचा पेमगिरी ग्रामस्थांनी जिर्णोद्धार केला आहे. पेमगिरी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नूतन मारुती मंदिराच्या सुबक कामामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. माजी महसूलमंत्री आ. थोरात यांच्या प्रयत्नाने या गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. पेमगिरीचा शहागड, ऐतिहासिक वडाचे झाड आणि गावातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी मंदिर येथे जिर्णोद्धारपश्‍चात मूर्ती पुर्नप्रतिष्ठापणा सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. याप्रसंगी खा. सदाशिव लोखंडे, विधान परिषदेचे आ. डॉ. सुधीर तांबे, पारनेरचे आ. विजय औटी, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती निशा कोकणे, सभापती अजय फटांगरे, रणजितसिंह देशमुख, कृष्णकुमार गोयल, द्वारकाप्रसाद सोनी, मारुती कवडे, सुनिता कानवडे, पाडुरंग घुले आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पेमगिरी फाऊंडेशन ट्रस्ट आणि पेमगिरीच्या सर्व संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.