Breaking News

साखर कारखानदारांसमोर अनेक यक्षप्रश्न


कोेपरगांव:  पुढील वर्षी मोठया प्रमाणात उसाच्या लागवडी शेतक-यांनी केल्या असून या ऊसाचे करायचे काय, असा प्रश्न मोठया प्रमाणात निर्माण होणार आहे. गाळप हंगाम कसा पार पाडायचा आणि एफआरपी कशी दयायची, हे प्रश्न साखर कारखानदारांसमोर निर्माण होणार आहेत.

राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा एकूण १८७ साखर कारखान्यांपैकी ४२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. दि. २६ मार्चपर्यंत राज्यात ८ कोटी ८९ लाख ४७ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून त्यापासून ९ कोटी ९० लाख ३३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा ११. १३ असा आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे विभागात झाले असून ६१ कारखान्यांनी ३ कोटी ८८ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सर्वात कमी साखर उत्पादन नागपूर विभागाचे झाले आहे. तेथील ४ साखर कारखान्यांनी ४ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच तारखेला १४९ साखर कारखाने बंद झाले होते. उसाच्या कमतरतेमुळे साखरेचे उत्पादन अवघे ४ कोटी १७ लाख ९६ हजार क्विंटल झाले होते.