Breaking News

अवैध दारू अड्ड्यांवर छापा ३ हजारांचा मुद्देमाल जप्त


 घारगाव पोलिसांनी तालुक्याच्या पठार भागातील अवैध दारू विक्री करणाऱ्या धंदेचालकांच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली. यात दोन वेगवेगळ्या ठिकाणावर छापे टाकत पोलिसांनी सुमारे ३ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टी, देशी संत्रा दारू जप्त केली.

पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शिवाजी नामदेव कौटे (वय २५, रा. मामेखेल ता. संगमनेर) याने त्याच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू चोरून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. दुसऱ्या घटनेत पोलिसांनी सायंकाळी सुमारे साडे पाच वाजेच्या दरम्यान टाकलेल्या छाप्यात तालुक्यातील वरुडीपठार येथे बाळू रामभाऊ केदार (वय ३८, रा. वरुडीपठार ता. संगमनेर) याच्याजवळ सुमारे २ हजार ८० रुपये किंमतीची देशी संत्रा दारू आढळून आली. याबाबत घारगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध {मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम ६५ ई नुसार} गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पोसई. इनामदार, पो. ना. लंघे, पोना. खैरे, महिला पोलीस झावरे करीत आहेत.