Breaking News

कविकुलगुरू कालिदास आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठात करार

नागपूर, दि. 29, मार्च - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठ, बंगलोर या दोन विद्यापीठांमध्ये 27 मार्च रोजी शैक्षणिक, संशोधन क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या संदर्भातील करारावर कुलसचिव डॉ. अरविंद जोशी आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठाच्या कुलसचिव शिल्पा केएएस यांनी स्वाक्ष-या केल्या. याप्रसंगी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, विद्यापीठ नियोजन मंडळाचे संचालक डॉ. सी.जी. विजयकुमार, कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एम. जी. वेंकटेशम, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. व्ही. शिवानी, सावित्राीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर विशेषत्वाने उपस्थित होते.

विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डॉ. सी. जी. विजयकुमार विशेषत्वाने उपस्थित होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय, रामटेक, कर्नाटक संस्कृत विद्यापीठ, बेंगलुरू आ णि पाली, संस्कृत व तौलनिक दर्शन आंतरराष्ट्रीय संस्था, कलबुर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथील विश्‍वविद्यालयाच्या मुख्यालयात द्विदिवसीय ‘पाली शब्दव्युत्पत्ती कार्यशाळे’चा समारोप आज झाला. या समारोप सत्रात डॉ. सी. जी. विजयकुमार यांनी मार्गदर्शन केले.