Breaking News

युवा आक्रोश मोर्चाला श्रीरामपूरातील शेकडो युवकांचा प्रतिसाद

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित युवा आक्रोश मोर्चाला श्रीरामपूर शहर व तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते केतन खोरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे असंख्य युवकांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी गेल्या वर्षभरापासून राज्यभरात युवकांचे संघटन बांधत शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात आंदोलने, मोर्चे करून प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. मात्र त्यांच्या घरच्या अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच निघणार्‍या मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ग्रामीण नगर जिल्ह्यातून श्रीरामपूर शहर व तालुक्यातील युवकांचा प्रतिसाद सर्वाधिक असल्याचे यावेळी स्पष्ट दिसत होते. केतन खोरेंसह कैलास बोर्डे, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल, गणेश ठाणगे, योगेश जाधव, विठ्ठल गोराणे, गुरूचरण भटियानी, निखिल सानप, प्रसाद चव्हाण, आलीम शेख, सैफ शेख, विजय शेलार, गणेश मोरगे, स्वप्नील जाधव, शुभम चोथवे, सुधाकर आढंगळे, चेतन भोगे, अरुण बुर्‍हाडे, विवेक तांबे, बापू आजगे, प्रसन्न शेटे यांच्यासह अनेकांनी यासाठी परिश्रम घेतले.