Breaking News

छोट्या पुढार्‍याने घेतले जगदंबा मातेचं दर्शन

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर प्रखरपणे बोलणारा श्रीगोंदा तालुक्यातील छोटा पुढारी आणि बालकलाकार घनश्याम दराडे याने राशिनच्या जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राशिनचे गुरव पुजारी विश्‍वास रेणुकर यांनी त्याचा सत्कार केला.

नव्याने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवत मी येतोय छोटा पुढारी हा मराठी नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात मुख्य कलाकार असलेल्या घनश्याम दराडेला माध्यमांनी चांगलाच चर्चेत आणला. मुर्ती लहान पण किर्ती महान असा घनश्याम हा शेतकर्‍यांचा बुलंद आवाज आहे. राजकारणावर बोलत असला तरी तो राजकारणी नाही. गावरान भाषेतुन अनोख्या पध्दतीने प्रश्‍न मांडणारा शेतकर्‍यांचा प्रतिनिधी आहे. 12 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित करुन त्याने रुपेरी पडद्यावर एंट्री केली आहे.कुलदैवत असलेल्या जगदंबा देवीचे आई-वडीलांसमवेत त्याने दर्शन घेतले.