Breaking News

गायकवाड यांनी केले विषमुक्त शेतीसाठी मार्गदर्शन


संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेरचे उपसभापती सतिष कानवडे यांच्या सेंद्रीय शेतीद्वारे बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी भेट देऊन विषमुक्त शेतीसाठी मार्गदर्शन केले. कानवडे हे १२ वर्षांपासून सेंद्रीय शेती करीत आहेत. विषमुक्त भाजीपाला, देशी बियाणे व धन्वंतरी औषधी उद्यानाची ते उभारणी करीत आहेत.
देशातील प्रसिद्ध बीव्हीजी ग्रुप सेंद्रीय शेती, विषमुक्त अन्न व भाजीपाला यासाठी शास्त्रशुद्ध पध्दतीने देशात काम करीत आहेत. कानवडे यांच्या सेंद्रीय शेती प्रयत्नांचे गायकवाड यांनी यायला कौतुक केले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. जयदिप निकम, संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, उद्योजक बाळासाहेब नवले, विधिज्ञ कैलास हासे, कृष्णा दुध संस्थेचे व्हा. चेअरमन सुनिल कानवडे, बाळकृष्ण गांडाळ, अमोल डुबे, सागर कानवडे आदींसह ग्रामस्थ आणि बीव्हीजी ग्रुपचे अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

याप्रसंगी हनुमंत गायकवाड यांनी कँन्सरमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सकस व सेंद्रीय पध्दतीचे शेती उत्पादनास अतिशय महत्व असल्याचे सांगितले. ते म्हणाले, बीव्हीजी ग्रुपद्वारे सर्व देशात सेंद्रीय शेती व विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला यासाठी आम्ही मार्गदर्शन करीत आहोत. सतिष कानवडे य़ांचे प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत. भविष्यकाळात देशी बियाणे मिळणे अतिशय कठिण होईल, ही शक्यता ओळखून कानवडे यांची दुरदृष्टी निश्चित उपयुक्त ठरेल. हनुमंत गायकवाड व डॉ. जयदिप निकम यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सतिष कानवडे यांनी आभार मानले.