Breaking News

सौदी अरेबियावरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली : सौदी अरेबियात नव्याने झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा भारताने तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या दहशतवादाशी आणि हिंसात्मक कारवायांशी लढण्यास संकल्पबद्ध असल्याचा पुनरुच्चारही केला आहे. सौदीच्या रियाधसह इतर शहरांतील मानवी वस्त्यांना लक्ष्य करून हे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत.

सौदीतील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हौती बंडखोरांनी रविवारी येमेनमधून 7 क्षेपणास्त्रे डागली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील रियाध आणि इतर शहरांच्या नागरी भागात नव्याने झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा आम्ही तिव्र निषेध करतो. धमकावण्यात येत असलेल्या निष्पाप नागरिकांच्या सोबत आहोत. कोणत्याही स्वरुपाच्या दहशतवादाशी आणि हिंसात्मक कारवायांचा सामना कराला आम्ही संकल्पबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतो, असे परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.