Breaking News

साई प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

साईबाबांनी सुरु केलेल्या रामनवमी उत्सवानिमित्त येथील साई प्रतिष्ठानच्यावतीने ‘प्रिय आमचा महाराष्ट्र’ हा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे होत्या. नगरसेविका अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन कोते, कमलाकर कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, पतिंगराव शेळके, सुजित गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, छाया शिंदे आदी उपस्थित होते. 

यावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारे हरचंद सावला आणि अजय मुनोत यांना साईसेवक पुरस्कार देण्यात आला. शिर्डी शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच काशी ते शिर्डी व पंढरपूर ते शिर्डी साईजल दिंडी घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना धार्मिक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शालिनी विखे यांनी साईप्रतिष्ठानच्या कार्याचे दखल घेऊन हे कार्य कौतुकास्पद आहे.