Breaking News

विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. राजळे


शेवगांव प्रतिनिधी दि.29 :- प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वार्डातील विकास काम करतांना ते चांगले कसे होईल याकडे लक्ष द्यावे व त्या कामांसाठी निधी कमी कमी पडणार नाही याची काळजी मी घेईल असे आश्‍वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले. शेवगांव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं. 6 व 15 या प्रभागातील बंदिस्त गटाराचे भूमिपूजन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. शेवगाव शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शेवगांव व पाथर्डी च्या पाणीपुरवठा योजनांना लवकरच मंजूरी मिळेल असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक अरुणभाऊ मुंडे ,भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शहर अध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा युवा मोर्चो चे ता.अध्यक्ष नितीन फुंदे, तुषार वैद्य, मंगलताई कोकाटे, राजाभाऊ लड्डा, अ‍ॅड.संजय सानप, भिमराज सागडे, विवेक नाईक, स्वाभिमानीचे शहरअध्यक्ष दत्ता फुंदे, गणेश कराड, कचरू चोथे,जलील राजे, अनिल तानवडे, सालारभाई शेख, भाउसाहेब मुंढे, गंगा खेडकर, सुरेश बडे, साईनाथ आधाट, दिगंबर काथवटे, उदय शिंदे, राहूल बंब, संतोष जाधव, अंकूश कुसळकर, विनोद मोहिते, मालाणी , आशोक ढाकणे ,कैलास सोनवणे, अनिल खैरे, रामा कोळगे, गोपूभाई शेख, अनिल वडागळे, शेख ईस्माईल आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक ढोरजळगांवचे सरपंच गणेश कराड व आभार बंडू मेहर यांनी मानले.