Breaking News

राज्यात चार दिवस पावसाची शक्यता

पुणे - अरबी समुद्रात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशात चक्राकार वा-यांच्या स्थितीमुळे आजपासून पुढील चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाची शक्यता नाही. मात्र, आजपासून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्यात रविवारपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल तसेच राज्याच्या काही भागांत ढगाळ हवामान राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापूर पट्ट्यात चांगलाच पाऊस पडला. तर आज सकाळपासूनच पुणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पट्ट्यात ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी अद्याप सुर्याचे दर्शन झालेले नाही.