Breaking News

टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात करणार - चंद्रकांत पाटील


टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर हा रस्ता राज्यमार्ग क्र.145 मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. याबाबत लवकरच क ार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान सभेत सांगितले.

यासंदर्भात सदस्य त्र्यंबकराव भिसे यांनी विधान सभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, याबाबत राज्यमध्ये 6 कोटींची कामे मंजूर केली आहेत. यासाठी निविदा क ाढण्यात आल्या असून राज्यात 29 कोटी 47 लाखाचा निधी यासाठी देण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून 30 कोटी 59 लाख देण्यात आले आहेत. रूंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले असून रुंदीकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप सोपल, सुभाष साबणे यांनी सहभाग घेतला.