Breaking News

लाचखोर अधीक्षक अभियंत्याला अटक


सोलापूर, जलसंपदा विभागात केलेल्या कामापोटी जमा केलेली रक्कम परत देण्यासाठी ठेकेदाराकडून 80 हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अ भियंता व त्यांच्या वाहनचालकाला एसीबीने अटक केली.अधीक्षक अभियंता राजकुमार जर्नादन कांबळे (रा. सोलापूर) आणि कारचालक कैलास सोना अवचारे ( रा. मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत एका ठेकेदाराने एसीबी पथकाकडे तक्रार दिली होती.ठेकेदाराने एकरूख उपसा सिंचन योजनेत कालव्याचे मातीकाम व बांधकाम ठेका घेतला होता. त्यामुळे सुरक्षा अनामत म्हणून जलसंपदा विभागाकडे 14 लाख 16 हजार रुपये जमा केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते पैसे परत मिळण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला होता. त्यासाठी दोन लाख रुपयांची लाच कांबळे यांनी मागितली होती. त्यापैकी एक लाख वीस हजार रुपये आधी दिले होते. मंगळवारी 80 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ती रक्कम देण्यासाठी ठेकेदार हे कांबळे यांच्या घरी गेले. ठेकेदार पैसे देताना त्यांनी घेतले. पण, त्यांना संशय आल्यामुळे चालक अवचारे यांच्याकडे पैसे दिले. विजापूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.