Breaking News

हनुमान जंयती उत्सवाचे आयोजन

प्रवरासंगम येथे येत्या शनिवारी {दि.३१} रोजी सालाबादप्रमाणे याहीवर्षी हनुमान जंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मण भवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी प. पू. सदगुरु १००८ श्री. बाल ब्रम्ह चारी महाराज {सिध्देश्वर, मंदिर टोका} यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त सकाळी महाआरती होणार असून त्यानंतर सुप्रसिद्ध किर्तनकार गजानन शास्त्री महाराज यांचे किर्तन होणार आहे. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.