Breaking News

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले!


तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्‍या ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने नुकतेच प्रारूप आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणाबाबत दि. २८ मार्चपर्यंत हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम आरक्षण दि. १३ एप्रिल रोजी जाहिर होणार आहे. या आरक्षणानुसार सर्वच ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण निम्यापेक्षा अधिक असणार आहे. 
बारागावनांदूर येथे महसूल प्रशासनाचे मंडलाधिकारी गाडे यांनी ग्रामस्थांची बैठक घेत ६ प्रभागातील १७ जागांसह सरपंचपदाच्या निवडीबाबत आरक्षणाची प्रारूप यादी जाहीर केली. येथील सरपंचपदासाठी अनुसूचित जाती महिलासाठी हे पद राखीव आहे. ब्राम्हणीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अन्य ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे: घोरपडवाडी सरपंचपदासाठी अनुसूचित जाती महिला, तमनर आखाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, गंगापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, मोमीन आखाडा सर्वसाधारण व्यक्ती, दरडगाव थडी अनुसूचित व्यक्ती, धामोरी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, धामोरी खुर्द अनुसूचित जमाती व्यक्ती, म्हैसगाव सर्वसाधारण व्यक्ती, देसवंडी सर्वसाधारण व्यक्ती या प्रकारे सरपंचपदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याप्रमाणे राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जून ते सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकींना अधिक महत्व प्राप्त होणार आहे. 

६.