Breaking News

आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेटरविरुद्ध गुन्हा दाखल


तालुक्यातील राहुरी विद्यापीठ परिसरातील कॅन्टीनच्या मालकाकडून सातत्याने होत असलेल्या अन्यायाला कंटाळून एका वेटरने राहुरी पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. खुद्द ठाणे अंमलदाराच्या दालनातच ही घटना घडल्याने पोलिस कर्मचार्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी गुलाब महादू सिनगारे {हल्ली मुक्काम- सिडको, नाशिक} याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
येथील फुले कँन्टीनचा मालक प्रचंड काम करुन घेत असून खायला सतत शिळा भात खायला देत असल्याचा आरोप या वेटरने केला आहे. एकदिवशी भाताऐवजी या वेटरने चपाती खाल्ली असता मालकाने वेटरला लाकडी दांडक्याने त्याला जबर मारहाण करून त्यास कामावरुन काढले. तब्बल आठ महिन्यानंतर राहुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. कँटीन मालकाविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.