Breaking News

प्रज्ञा गोरे हिचे वकृत्व स्पर्धेत यश

कोपरगाव : अहमदनगर येथे रुपीबाई बोरा विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी प्रज्ञा अशोक गोरे हिने बाल गटातून जिल्ह्यात तृतिय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. ‘सुंदर माझी शाळा’ या विषयावर तिने या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविले. यापूर्वीही तालूकास्तरीय वकृत्व स्पधेत तिचा प्रथम क्रमांक आला होता. यासाठी तिला मुख्याध्यापक सुखदेव कराळे, वर्गशिक्षिका श्रीमती छाया वडनेरे आदींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रज्ञाचे सर्वत्र कौतूक होत आहे.