Breaking News

कुकडी पाण्यापासून वंचित 10 ते 14 चारी लाभधारक शेतकर्‍यांची बैठक

कुकडीचे आवर्तन 15 एप्रिल 2018 रोजी सोडून 20 एप्रिलच्या दरम्यान श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील मागील आवर्तनापासून वंचित राहिलेल्या 10 ते 14 नंबर चार्‍यांना पाणी देण्याचे आंदोलन मागे घेत असताना निश्‍चित झाले होते. त्यानंतर कुकडी सल्लागार समितीची बैठक 14 एप्रिलच्या दरम्यान घेण्याऐवजी ती 24 एप्रिल रोजी घेतली. आता येडगाव धरणात 1500 द.ल.घ.फुट पाणी साठा झाल्यावर कुकडी कालवा सोडला जाणार आहे. सध्या डिंभे आणि माणिकडोह धरणातून दररोज 100 द.ल.घ.फुट पाणी सोडले जात असून 5 मे पर्यंत येडगाव मध्ये 1500 द.ल.घ. फुट पाणी साठा होईल, मग कालवा सोडला जाईल. ते पाणी 10 मे च्या दरम्यान चारी क्रमांक 10 ते 14 ला पोहचेल. 15 एप्रिल पूर्वी सल्लागार समितीची बैठक घेण्यासाठी आणि येडगाव धरणात पाण्याचे फीडिंग करून घेण्यासाठी नगर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला नाही. हा निष्काळजीपणा पुणे जिल्ह्याच्या पथ्यावर पडला. आवर्तन सुमारे 20 दिवस लेट करून शेतकर्‍यांना वेठीला धरण्याचे काम कालवा सल्लागार समितीने केले आहे. चारी 10 ते 14 खालील सर्व शेतकर्‍यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येतेकी, आगामी आवर्तनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी रविवार दि. 29 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सिध्देश्‍वर मंदिर, श्रीगोंदा येथील हॉलमध्ये बैठक आयोजित केली आहे. श्रीगोंदा, आढळगाव, भावडी, कोकणगाव, हिरडगाव, घोड़ेगाव, चांडगाव, टाकळी, शेडगाव व 10 ते 14 चारी खालील सर्व शेतकर्‍यांनी उपस्थित राहण्याचेे आवाहन प्रा.तुकाराम दरेकर यांनी केले आहे.