Breaking News

अपघातात 10 जणांचा मृत्यू

गांधीधाम : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील शिक्रा गावाजवळ झालेल्या बस अपघातात 7 महिला आणि 1 अल्पवयीन मुलासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भचुआ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, संबंधित ट्रॅक्टर एकाच कुटुंबातील 25 लोकांना घेऊन लग्नाच्या कार्यक्रमासाठी शिक्रावरून विज पसार येथे चालला होता. ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्याने गांधीधामवरून कुंभार्डीला जाणार्‍या लक्झरी बसला जोरदार धडक दिली. यात 10 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.