Breaking News

वीज कोसळल्याने 4 जण जागीच ठार

यवतमाळ - अचानक पाऊस आल्याने आडोसा घेण्यासाठी काही जण झाडाखाली थांबले होते. पण, वीज कोसळल्याने त्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 4 जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महागाव तालुक्यातील वेणी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. बकर्‍यांना चरण्यासाठी नेले असताना अचानक पाऊस आल्याने काही जण शेतकरी प्रल्हाद रामटेके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली आडोश्याला थांबले होते. मात्र, झाडावर कोसळल्याने त्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर 4 जण जखमी झाले आहेत. 
प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी मृतांची नावे आहेत. तर जितेंद्र सुरदूसे, विशाल सूरकळे, कैलास सुरोशे आणि दत्ता मदने हे चौघे जण जखमी झाले आहेत. 
त्या जखमींवर सवाना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बोरी अरब येथे वीज कोसळल्याने 7 बकर्‍या ठार झाल्या आहेत.