Breaking News

बेळगावमध्ये 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावमध्ये 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अजित कुमार निदोनी या आरोपीला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व बनावट नोटा मुंबईत छापण्यात आल्याचा संशय असून विशेष पथक याची सखोल चौकशी करत आहे. या नोटांमध्ये 500 रुपयांच्या 25 हजार 300 नोटा तर 2 हजार रुपयांच्या 29 हजार 200 नोटा आहेत. ही रोख रक्कम राजकीय पक्षाकडून निवडणुकीत वाटण्यासाठी नेली जात असल्याचाही संशय आहे.