Breaking News

बळीराजाच्या उपवर मुलामुलींची नावनोंदणी मोहिम, ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार

राहाता प्रतिनिधी - राज्यात शेतकरी बांधवांच्या मुलामुलींचे विवाह जमविण्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. विवाहोत्सुक युवकयुवतींच्या नावनोंदणीची मोहिम हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जी. बी. घोरपडे, साथी देवराम अंभोरे, काॅम्रेड प्रा. एल. एम. डांगे, सामाजिक कार्यकर्ते विनायक निकाळे आदी उपस्थित होते. 

या मोहिमेअंतर्गत पालकांनी आपल्या मुलामुलींचे नावे नोंदवावीत, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने करण्यात आले आहे. मुलामुलींचे विवाह जमवितांना आणि नवीन सोयरीक शोधतांना शेतकरी पालकांची मोठी वणवण होते. शेतकरी कुटूंबात मुलगी देण्याबाबत काहींची मानसिकता नसते. त्यामुळे राहाता तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विवाहोत्सुक विवाहयोग्य मुलामुलींची नावनोंदणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.