Breaking News

मातंग समाजाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास तात्काळ अटक करण्याची मागणी


शेवगाव प्रतिनिधी - श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे मातंग समाजाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन आज शेवगावचे पर्यवेक्षाधिन उपधीक्षक निलाभ रोहन यांना मातंग समाजाच्या वतीने देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव या गावामध्ये मातंग समाजाच्या मुलीवर काही नराधमांनी बलत्कार केला. व श्रीगोंदा पोलीस स्थानकात या संदर्भात 376 गुन्हा दाखल होवूनही अद्यापपर्यंत आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाट फिरत आहे या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व या आरोपीस मदत करणार्‍या श्रीगोंदा पोलीस निरीक्षकास यामध्ये सहआरोपी करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन काल ( दि.13 ) रोजी शेवगाव चे पर्यवेक्षाधिन पोलीस उपअधीक्षक निलभ रोहन यांना निवेदनाव्दारे मातंग समाजाने केली. जर आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर मातंग समाजाच्या वतीने कोणतीही पूर्व सुचना न देता महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन साठे, अनिल सरोदे, अशोक ससाणे, संजय नांगरे, भगवान मिसाळ, प्राध्यापक दत्तात्रय तुजारे, देवराम सरोदे, अशोक शिंदे, अक्षय मिसाळ, प्रवीण भारस्कर आदींच्या सह्या आहेत.