Breaking News

राहूल गांधींच्या विमानात बिघाड

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे विशेष विमान नवी दिल्लीहून कर्नाटकातील हुबळी येथे जात असताना विमानाचे संतुलन बिघडले होते. एवढेच नव्हे तर विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्कही काही काळासाठी तुटला होता. या मोठ्या अपघातातून राहुल गांधी बचावले. मात्र राहुल गांधींच्या विमानाचे संतुलन मुद्दाम बिघडवण्यात आले होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधींचे सहकारी कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटकाचे महासंचालक व महानिरीक्षक नीलमणी एन. राजू यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी विमानाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.