Breaking News

सुकमा येथील चकमकीत दोन नक्षलवादी ठार

सुकमा : सैन्य दल व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका महिला नक्षलवाद्यासह दोन नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. चिंतागुफा येथील दुलेड ठाणे परिसरात अजूनही चकमक सुरू असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एसटीअफ व डीआरजीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कारवाईत हे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अ भिषेक मीना यांनी चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे. नक्षलविरोधी कारवायांमध्ये सुरक्षा दलाला एकापाठोपाठ यश मिळत आहे. शुक्रवारीदेखील सुरक्षा दलांनी बीजापूर येथे मोठी कारवाई करत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये 6 महिलांचा समावेश होता. गुरूवारी अबूझमाड येथील 60 नक्षलवाद्यांनी बस्तरच्या महानिरीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले.