Breaking News

भिंगारमध्ये मोटारसायकल रॅलीद्वारे जाती तोडो, समाज जोडोचा संदेश


नगर । प्रतिनिधी - समाजा-समाजातील जातीय द्वेष नष्ट करुन, सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याच्या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भिंगार येथे भीम समता मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जाती तोडो, समाज जोडोचा संदेश देत मोठ्या संख्येने युवक या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आरपीआयचे राज्य सचिव अशोक गायकवाड व कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन रॅलीला प्रारंभ करण्यात आला.