Breaking News

भातकुडगाव येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

भातकुडगाव (प्रतिनिधी) - शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे विश्‍वसम्राट युवा ग्रुपच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप लांड शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, जेष्ट साहित्यिक चंद्रकांत म्हस्के , कामधेनूचे अध्यक्ष बाळासाहेब काळे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बाप्पूसाहेब राशीनकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, शिवशाहीर कल्याणराव काळे, भास्कर शिंदे , सखाराम लव्हाळे, बाबूलाल पटेल , विठ्ठल वाघमोडे, शिवनाथ फटांगरे, सर्जेराव नजन , राजेश लोमटे ,भाऊसाहेब शिंदे , हमीद सय्यद , कचरू जमधडे, रावसाहेब घुमरे, रामभाऊ शिदोरे, संदीप साळवे , चित्तरंजन घुमरे विजय साळवे , सुभाष दळवी, बंडू साळवे , संदीप साळवे, शिवाजी दळवी , संदीप बनसोडे, दिलीप साळवे ,मोहन दळवी , आबासाहेब साळवे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे आर आर माने, शहाराम आगळे, बाबासाहेब जमधडे ,संभाजी आहेर , अशोक फटांगरे, बाळासाहेब साळवे, देवांकुर शिदोरे, अंतोवन साळवे, ज्ञानेश्‍वर दुर्गेष्ट, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.