Breaking News

घरकुलांची कामे दर्जेदार व्हावीत - आ. राजळे


पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे कामे दर्जेदार व तातडीने व्हावीत. असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना आमदार मोनिका राजळे यांनी दिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या शुभमुहुर्तावर, रमाई आवास योजना 2017/18अंतर्गत मंजुरी आदेशाचे वितरण आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते मंजूर लाभार्थांना करण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, सदस्य सुनिल ओव्हळ, मा.जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, नगरसेविका मंगल कोकाटे, माळी बाभुळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र वायकर, रशिदभाई शेख, विजय बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी राजळे म्हणाल्या जी घरकुले मंजूर झाली आहेत त्यांची कामे शासकीय अंदाजपत्रकानुसार उत्तम दर्जाची व्हावीत. सदर घरांची कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. ज्यायोगे पुढील वर्षासाठी उर्वरीत लाभार्थ्यांची कामे प्रस्तावित करता येतील. सदर योजना अतिशय चांगली असून चांगल्या पद्धतीने राबविली तर अनेक गोरगरिबांना तिचा लाभ मिळेल. या वास्तूंत लाभार्थ्यांना वास्तव्य क रायचे असल्याने मिळालेल्या निधीचा पुरेपूर वापर व्हायला हवा. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी भविष्यात मी कटिबद्धध राहिल.