Breaking News

… तर लाभधारक शेतकरी कुटुंबासमवेत आत्मदहन करणार : गिते


राहाता प्रतिनिधी - निळवंडे धरण पूर्ण होऊन १० वर्षे उलटली आहेत. मात्र कालव्याअभावी गेली ५० वर्षे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी कालव्याच्या निधीअभावी मिळेना. तेच पाणी प्रवरा नदीत रात्रंदिवस दिवस वाहते आहे. सरकारने निळवंडेवरुन पाईपलाईनने पाणी शिर्डी व कोपरगावला देण्याचा जो घाट घातला, त्याचा लाभधारक शेतकरी जाहीर निषेध करत आहेत. जर हे पाणी खाली नेण्याचा घाट घातला तर लाभधारक शेतकरी कुटुंबासमवे आत्मदहन करतील, असा इशारा निळवंडे धरण उजवा कालवा कृती समितीचे अध्यक्ष भारत गिते यांनी दिला आहे. 

यासंदर्भात गीते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शरद पवार विराजमान झाले तेव्हा निळवंडे धरणांच्या पाया भरणीचा कार्यक्रम झाला ५० वर्षानंतर धरण पुर्ण झाले त्या धरणांत ९ टि एमसी पाणी २ वर्षापासुन अडविले जाते . आघाडी सरकारच्या काळात कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात यांनी धरणासह कालव्याने निधी मिळवला. मात्र दुर्देवाने आघाडी सरकार कोसळले व राज्यात युतीचे शासन आले अनेक वेळा कालव्यांना निधीची मागणी केली. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी केंद्रिय जलनिधी मिळण्याचे गाजर दाखविले. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे कालव्यांना निधी मिळाला. ते०हा लाभधारक शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. पण या धरणामधुन शिर्डी व कोपरगांव या शहरांना बंद पाणी पुरवठा योजनेतुन पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. हे निश्चित निळवंडे धरण लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. या दोन्ही शहरांना गोदावरी नदी व मध्यमेश्वर धरण जवळ आहे नाही तर कोपरगावजवळ मोठा बंधारा बांधावा व या शहारांना पाणी द्यावे. मात्र दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणु नये. अन्यथा आता दोन्ही कालव्यांच्या लाभधारक शेतकरी पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही.