Breaking News

धनुर्विद्या प्रशिक्षणात सहभागी व्हा : तनपुरे

राहुरी विशेष प्रतिनिधी  - हल्ली मल्टीमिडीया मोबाईलच्या जमान्यात लहानापासून ते युवकापर्यंत सर्वच तरुण खेळापासून दूर चालले आहेत. अशा लहान मुलांना आतापासूनच प्रशिक्षण मिळाले तर भविष्यात त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल. यासाठी स्वराज्य धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या धनुर्विद्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा नेते हर्ष तनपुरे यांनी केले.

शहरातील तनपुरेवाडी येथील धनुर्विद्या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू रविंद्र हिराचंद तनपुरे यांनी शहरातील युवकांना धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी स्वराज्य धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे होते. यावेळी जिल्हा क्रीड़ा शिक्षक संघटनेचे नितीन घोलप, आंतरराष्ट्रीय कोच आर्चरी संघटनेचे अभिजीत दळवी, स्वराज्य धनुर्विद्या अँकडमीचे संस्थापक अध्यक्षा शुभांगी दळवी आदी उपस्थित होते.