Breaking News

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी


कोपरगांव ता.प्रतिनिधी तालुक्‍यातील कारवाडी येथिल वीटभट्टीवर काम करणा-या मजुर जोडप्याच्या सात वर्षाच्या मुलीवर आरोपी शंकर पांडुरंग गायकवाड रा. कारवाडी याने बलात्कार केला होता. याप्रकरणी कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गुरनं ११८/ २९१६ चा भादवि कलम ३७६, ३६३ व लैगिंक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्ह्याचा तपास सपोनि पी.वाय.कादरी यांनी करुन दोषारोप पत्र मा.जिल्हा व सत्र न्याय कोपरगांव वर्ग क्र १ यांचे समोर सादर केले होते. सरकारी पक्षाचेवतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सदर आरोपीस मे न्यायालयाने भादंवि कलम ३७६ प्रमाणे १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व ५०००-/रु दंड .दंड न भरल्यास १ वर्ष कारावास. तसेच भादवि ३६३ प्रमाणे ५ वर्ष सक्तमजुरी व ३०००-/रु दंड न भरल्यास तीन महिने कारावास.बा.लै.अ.स.का.क ४ प्रमाणे १० वर्ष सक्तमजुरी व ५०००/- रु दंड व दंड न भरल्यास १वर्ष कारावास याप्रमाणे शिक्षा सुनवण्यात आली. सरकार तर्फे सदर केसचे कामकाज सहा.सरकारी वकिल ॲड. बाबासाहेब पानगव्हाणे यानी पाहीले आहे.