Breaking News

पानेगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


पानेगाव(प्रतिनिधी)- नेवासे तालुक्यातील पानेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच 
संजय जंगले , उपसंरपंच रामभाऊ जंगले, ग्रामसेवक गणेश डोंगरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौथारा येथे प्रतिमेचे पूजन करून तोफांच्या आतिषबाजीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सोपानराव जंगले,बाळासाहेब काकडे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले राजेंद्र वाघमारे ,राजेंद्र शेंडगे, बाळासाहेब घोलप, संजय वाघमारे, जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,सतिश जंगलेसुनील चिंधे, सतिश वाघमारे सुत्रसंचालन गणेश डोंगरे यांनी केले.