Breaking News

डाक कार्यालयात आधार नोंदणी केंद्राचा शुभारंभ


पोस्ट ऑफिस हे सर्वसामान्य जनतेचं विश्­वसनिय केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता पोस्ट ऑफिसवर आता अतिरिक्त जबबादारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक बँकींग, विमा, आधार कार्ड नोंदणी सारख्या सुविधा पोस्ट ऑफिसद्वारे मिळणार आहेत. आधार कार्ड प्रत्येकाला सक्तीचे असणार आहे. आधार कार्डशिवाय व्यक्तीला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून सर्व कुटूंब प्रमुखांनी स्वत:बरोबरच कुटूंबाच्या सदस्यांच्या आधार कार्डच्या नोंदणीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.जिल्हा पोस्ट ऑफिस येथे भारतीय डाक विभागाच्यावतीने आधार नावनोंदणी आणि अद्यावत सेवा केंद्राचा शुभारंभ खा.गांधी यांच्या हस्ते झाला. यावेळी बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी, वरिष्ठ डाक अधीक्षक जालिंदर भोसले, नगरसेवक किशोर डागवाले, भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, अ­ॅड.राहुल रासकर, सागर गोरे, श्रीरामपूर डाक अधीक्षक उमेश जनावडे,संदीप हदगल, करण ढापसे आदीसह पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते