Breaking News

डॉ. आंबेडकर विश्वाची अनमोल देणगी : काळे

कोपरगाव ता. प्रतिनिधी आपल्या भारत देशाच्या पवित्र भूमीने अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे. या महापुरुषांनी देशाच्या अखंडतेसाठी व एकतेसाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा प्राणपणाने जोपासली. अशा थोर महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रभागी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित कोपरगाव येथे ते बोलत होते. युवा नेते आशुतोष काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी, विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे, मंदार पहाडे, सुनिल शिलेदार, सुनील मोकळ, नवाज कुरेशी, संतोष चवंडके, इम्तियाज अत्तार, गौतम बनसोडे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र आभाळे, फकीरमामू कुरेशी, दिनकर खरे, प्रसाद आढाव, नितीन बनसोडे, मनोज कडू, निखील डांगे, प्रसाद साबळे, नामदेव मोरे, गोरख पंडोरे, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, संदीप सावतडकर,बापू वढने, वाल्मिक लाहीरे, अंबादास वडांगळे, हिरामण कहार, सचिन बढे, धनंजय कहार, सुरज बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.