Breaking News

आसिफाला न्याय मिळावा यासाठी मुक मोर्चा

पाथर्डी (प्रतिनिधी) - जम्मू-काश्मीर मढील कठूवा येथील 8 वर्षाच्या चिमुरड्या आसिफाची अतिशय क्रूर व अमानवी पद्धतीने बलात्कार करून हत्या करण्यात आली व उन्नाव मधील बलात्कार आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व आरोपीच्या समर्थनार्थ रैली काढणार्‍या लोकांना आणि पीडिताच्या वकिलांला धमकी देणार्‍यावरही कठोर कारवाई व्हावी यासंदर्भात नाईक चौकातून मूक मोर्चा काढून पंचकृशितील समस्त नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आणि तहसिलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, नगरसेवक प्रसाद आव्हाड, महेश बोरुडे, इजाज शेख, सीताराम बोरुडे, अजय रक्ताटे, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ,दिगंबर गाडे ,अरविद सोनटक्के, हुमायून भाई आतार,चाँद मणियार,नासिर, शेख,मुन्ना पठाण,फारूक शेख,शौकत शेख,लालाभाई शेख, भारती असळकर,बाबा राजगुरू आदीउपस्थित होते. यावेळी केदारेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड प्रताप ढाकणे यांनी म्हटले की, देशातील प्रत्येक धर्मातील लोकांना अजून धर्मच कळाला नसून,अशा घटना घडल्यानंतर जातीचा विचार का केला जातो या घटना कोणासोबत ही घडू शकतात,अशी कृत्य करणारी माणसे ही सैतानाचे वंशज असतात म्हणून त्यांना धर्म नसतो ना माणुसकीची जाणीव, कुठलाही धर्म वाईट नाही,काही लोकांना स्वार्थसाठी जात आणि धर्म आठवतो,इतर वेळी त्याच धर्मचा विसर पडतो जोपर्यंत या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेऊ. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी 10 मागण्याची मागणी केली आहे. या मूक मोर्च्यात लहान मुलींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता