Breaking News

राऊत हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह, हृदयरोग तपासणी


कर्जत येथे नव्याने सुरु झालेल्या राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी सकाळी 9.30 ते 3 यावेळेत हे शिबीर होणार असल्याची माहिती मेडिकल डायरेक्टर डॉ. रविंद्र राऊत यांनी दिली.

राऊत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक आयसीयुची सुविधा कर्जतमध्ये प्रथमच उपलब्ध झाली आहे.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी आदींच्या उपस्थितीत नुकतेच हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ. रविंद्र राऊत व डॉ. अश्‍विनी राऊत यांनी सामाजिक भूमिका घेत हॉस्पिटल समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात मधुमेह, हृदयरोग व संधिवात तज्ञ डॉ.रोहन टोमके हे विशेष तपासणी करणार आहेत. शुगर तपासणी तसेच मोफत आरोग्य सल्ला या शिबिरातुन दिला जाणार आहे.शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.