Breaking News

शेतीतील नवी पिढी कौतुकास्पद - शरद पवार

शेतीतील नवी पिढी आधुनिकता स्विकारत असून स्वत:पुढे जातांना आजूबाजूच्या शेतकर्‍यांनाही पुढे जाण्यासाठी हातभार लावतात हे कौतुकास्पद आहे.आज स्थिती बदलत आहे.जे पीक आपण घेतो.त्याची उत्पादन खर्च कमी व उत्पादकता वाढवण्यावर भर दिला पाहिजे.एकेकाळी आयात केलेल्या डाळी,तांदूळ सारखे अन्न आज निर्यात होत आहे. अशावेळी नव्या जातींची लागवड व शेतात संमिश्र पिके तसेच आंतरपिके घेऊन अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल.भाजीपाला,फळांसाठी आपण जगात दुसर्‍या क्रमांकावर असलो तरी योग्य बाजारपेठ मात्र उपलब्ध नाही ती शोधून आपला शेतमाल जगाच्या नव्या बाजारात पोचविण्यासाठी पावले उचलावी लागतील असे ही ते म्हणाले.