Breaking News

रेल्वेत 'मदत' अॅपवर करता येईल तक्रार

नवी दिल्ली | टि्वटर, फेसबुक, हेल्पलाइननंतर आता रेल्वे विभागाकडून नवीन उपक्रम राबवला जात आहे. विभागातर्फे लवकरच 'मदत' अॅप लाँच करण्यात येणार आहे. यावर रेल्वेतील सेवांसंदर्भात तक्रारी करता येतील. अॅपच्या मदतीने प्रवासी भोजनाची गुणवत्ता, घाणेरडे शौचालय आणि सुरक्षेच्या बाबतीतील तक्रारी करू शकतील.